गवळी समाज बांधवांनो, जय श्रीकृष्ण. आपण आपल्या शहरातील गवळी समाज बांधवांची व समाजाची माहिती गवळी समाज वेबसाईट व मोबाईल अॅपवर प्रसारित करण्यासाठी आमच्या ई-मेल वर किंवा लेखी स्वरुपात किंवा या वेबसाईटच्या संपर्क फोर्म भरून पाठवून द्यावे. नजरचुकीने काही माहिती चुकीची आढळल्यास आम्हाला कळवा दुरुस्त केली जाईल.

अखिल भारतीय गवळी समाज

गोपाळ काला म्हणजे गवळी !
दही दुधाची साज म्हणजे गवळी !
श्रीकृष्णाचा आभास म्हणजे गवळी !
अशा या दुधा प्रमाणे शुभ्र, लोण्याप्रमाणे मऊ, दह्याप्रमाणे चविष्ट समाजाबद्दल द्वापर युगा पासून चालत आलेल्या परंपरा व एकोपा टिकवून ठेवण्यास आजही गवळी समाज प्रगती पथावर आहे. अशाच या समाजा बद्दल जाणून घेऊया...
महाराष्ट्रातील हा गोपाळकाला लिंगायत गवळी, मराठा गवळी, अहिर गवळी, यादव गवळी, चेले / चेवले गवळी, दाभोळे गवळी, नंद गवळी, ग्वालवंशी गवळी, गवलान गवळी, लाड गवळी, हणबर गवळी, गोपाळ गवळी, राणीया गवळी, ढोलीया व मालीया गवळी, ग्वाला गवळी, गोल्ला गवळी, मुस्लीम गवळी, गाय गवळी या पोटजातीतून तयार झाला आहे. गोपाळकाला प्रमाणे प्रत्येक पदार्थाची ज्याप्रमाणे चव असते तशाच पद्धतीने गवळी समाजाची महत्व वाढवणाऱ्या या पोट जाती आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येक पोटजातीचे वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत.

अधिक माहितीसाठी

समाजाची वैशिष्ट्ये

पोट-जाती, अखिल भारतीय गवळी समाज

लिंगायत गवळी | मराठा गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

अहिर गवळी | यादव गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

चेले (दाभोळे) गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

नंद गवळी | गाय गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

गवलान गवळी | लाड गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

हणबर गवळी | गोपाळ गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

राणीया गवळी | ढोलीया, मालीया गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

ग्वाला गवळी | ग्वालवंशी गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

गोल्ला गवळी | मुस्लीम गवळी

अखिल भारतीय गवळी समाज पोट-जात

आपले सण

अखिल भारतीय गवळी समाज

गोकुळाष्टमी

श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात. दुसर्‍या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय. श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत.

श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्‍या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते. गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते. हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.

पोळा

श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात. प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे.

कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात. बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत.

महादुआप्पांचा भंडारा

भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बिजेच्या दिवशी चिटगुप्पा ता. हुमनाबाद जि. बिदर याठिकाणी गवळी समाजाचे श्रद्धास्थान बालब्रह्मचारी महादुआप्पा यांच्या नावे श्री. महादुआप्पा मठामध्ये भंडाऱ्याचे नियोजन केले जाते. या भंडाऱ्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा राज्यातून मोठया प्रमाणात गवळी समाज बांधव एकत्र येतात. सलग ८ दिवस या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम व रोज दोन वेळेस भंडाऱ्याचे नियोजन केले जाते. बिजेच्या दिवशी होणाऱ्या भंडाऱ्याचे मोठया प्रमाणात नियोजन असते. या दिवशी सकाळपासून श्री. महादुआप्पांच्या मूर्तीस अभिषेक होत असते. दुपारी त्यांची पालखी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर रात्री भंडारा होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कावळीच्या जेवण असते. कार्यक्रमाची सांगता आरती करून केली जाते.

सावरगावाहून महाराजांचा दौरा निघाला थेट पंढरपूरजवळ शेटफळ मुक्कामी धनगरवाड्यावर आला. तेव्हा सर्व धनगरसमाजाने महाराजांना दही दुधाने आंघोळ घालून यथाविधी पूजा केली. तेव्हा महाराजांनी सर्व धनगरसमाजाचा उद्धार करून महाराज तेथे गुप्त झाले. नंतर त्यांचे शिष्य मिधबा बांळीग पुन्हा तिथून दीक्षा घेऊन जे निघाले ते फिरत फिरत चिडगोप्पा मुक्कामी स्थाईक झाले. चिडगोप्पा हे बिदर बादशहाच्या ताब्यात होते. एके दिवशी महाराजांची घोड्यावरून मुरवणूक निघाली असता बादशहास राग येऊन मोठा संग्राम घडला. त्यावेळेस धोकडे तुकोजीचे मस्तक उडविले. घुगरे मानाजी जमिनीवर कोसळून पडले. कित्येक लोक जखमी झाले. तेव्हा बाळलिंग आप्पांना मोठे संकट पडले असता त्यांनी आपले गुरु ब्रह्म सिधाजींचे नामस्मरण घेऊन भंडाळा उधळला. तितक्यात सर्व मूर्च्छित पडले दैवानी सिदाजी आप्पांचे चांगभले गर्जना केली. सर्वत्र आनंदी आनंद पसरला. बादशहाचा राग शांत झाला. तो दिवस म्हणजे भाद्रपद बिजेचा होता. तेव्हा पासून चिडगोप्यात बीजेला सिदाजी आप्पांची यात्रा म्हणून साजरी करतात. तीच यात्रा महादू अप्पांची सर्व बालगोपाळ मिळून भाद्रपद बीजेस साजरी करतात.

जाहिरात

We Meet Online

संपर्क

अखिल भारतीय गवळी समाज

पत्ता

अखिल भारतीय गवळी समाज
सोलापूर
संपर्क क्रमांक: +91 7385656599
WhatsApp क्रमांक: +91 9422645874
ईमेल आयडी: devaanjikhane1964@gmail.com

Social