महाराष्ट्र गवळी समाज संघटना हि गेल्या २५ वर्ष पासून महाराष्ट्रात गवळी समाजाच्या सर्व पोट जातीतील समाज बांधवांच्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. प्रथमतः संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. बाबासाहेब गलाट होते व त्यानंतर विद्यमान प्रदेशाध्यक्ष मा. किसनराव हुंडीवाले हे सध्या काम पाहत आहेत. संघटनेच्या प्रत्येक कार्यात सोलापुरातून खालील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग असतो.
शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्या मार्फत दरवर्षी लिंगायत गवळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा घेतला जातो. शहरातील गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. समाज बांधवांचे अडी-अडचणी सोडविल्या जातात. शिवपार्वती प्रतिष्ठान मार्फत गवळी समाजाची वेबसाईट व मोबाईल अॅप निर्मिती करून प्रसारित केली आहे. प्रमुख:
• ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने – 9422645874 • आनंद साठे – 9823408088 • दत्ता लकडे – 9373429631 • डॉ. प्रा. राजशेखर लालबोंद्रे - 9403876292 • गणेश जकनाईक - 9921085858
महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट
सोलापूर शहरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गवळी समाज महालक्ष्मी मंदिर सिव्हील हॉस्पिटल येथे सगर व गाय-म्हशीचे पूजन करून म्हशी पळविण्याचा कार्यक्रम होतो. दुसर्या दिवशी नवी पेठ, तिसऱ्या दिवशी कन्ना चौक, बाळीवेस व मरीआई चौक याठिकाणी सगर व गाय-म्हशीचे पूजन करून म्हशी पळविण्याचा कार्यक्रम होतो. तसेच चौथ्या दिवशी रेड्यांचे टकरीचे कार्यक्रम होतात.
आषाढ महिन्याच्या शेवटी अमावस्या दिवशी गवळी समाज महालक्ष्मी मंदिर सिव्हील हॉस्पिटल येथे दर वर्षी जत्रा भरते. दर तीन वर्षाला मोठी जत्रा भरते. यावेळी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या दिवशी सकाळी ११ वाजल्या पासून रात्री ९ वाजे पर्यंत महाप्रसाद चालु असतो. याप्रसंगी गवळी समजासह परिसरातील इतर समाज बांधवही महाप्रसादाचा लाभ घेतात. सायं. ४ ते ७ यावेळेत म्हशी पळविण्याचा कार्यक्रम असतो. महिनाभर शहरात महालक्ष्मीची आरती फिरवून गवळी समाज बांधवांकडे लोक वर्गणी (पैसे व धान्य स्वरुपात) जमा केली जाते.
महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट मार्फत सोलापूर शहरात चौपाड येथे ५००० sq.foot जागा खरेदी केली आहे. व त्याठिकाणी सांस्कृतिक भवन बांधण्याचा मानस आहे. प्रमुख:
• अनिल नायकु - 9422066997 • बाळासाहेब आकुसखाने - 9421067672 • अनिल शहापूरकर - 9960141228 • चंद्रकांत नायकु - 9370422701 • संभाजी झिपरे - 9823982545
सोलापूर गवळी समाज सुधारक मंडळ
गोकुळाष्टमी दिवशी राधाकृष्ण मंदिर चौपाड येथे श्रीकृष्ण जन्मोत्शव साजरा केला जातो.
यंदाच्या वर्षी राधाकृष्ण मंदिर देवस्थान, चौपाड या ठिकाणी भव्य वास्तू उभा करण्याचे नियोजित आहे. प्रमुख:
• लींबाजी कलगते - 9420660419 • कुमार साठे - 9823441717 • सचिन गड्याप्पा - 8855028488
सिदाजीअप्पा प्रतिष्टान संचालित सोलापूर शहर गवळी समाज सामुदाईक विवाह समिती
श्री सिदाजीअप्पा प्रतिस्ठान मार्फत दर दोन वर्षाला सामुदाईक विवाह सोहळा आयोजित केला जातो. प्रमुख:
• अनिल नायकु - 9422066997 • बाळासाहेब आकुसखाने - 9421067672 • अनिल शहापूरकर - 9960141228 • चंद्रकांत नायकु – 9370422701 • तुकाराम नायकु – 9822024866
सोलापूर गवळी समाज सहकारी पतसंस्था
सोलापूर गवळी समाज पथसंस्थेमार्फत फ़क़्त गवळी समाजातील बांधवांना कर्ज पुरवठा केला जातो.व दर वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. प्रमुख:
• ऑफिस - 0217-2726869 • परशुराम बहिरवाडे (कॅशियर) – 9028833277 • बाळासाहेब आकुसखाने - 9421067672
भगवा आखाडा (गवळी समाज तालीम)
कुस्ती हा प्रकार दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तालीम बंद पडत आहेत, बोटावर मोजण्या इथपत कार्यरत आहेत. अशा अवस्थेत सोलापुरात भगवा आखाडा (गवळी समाज तालीम) हि तालीम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. दशरथ मिसळ व शिवा परळकर ह्या वस्तादांकडून प्रशिक्षण मिळत आहे. या तालमीतील पैलवान महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारलेले आहेत. पै.भरत मेकाले, पै.नितीन खुर्द, पै.सचिन खुर्द या पैलावानांनी उपमहाराष्ट्र केसरी पद मिळवलेले आहे. प्रमुख:
• राजू परळकर – 9923229000 • पांडू परळकर – 9822663402 • दत्ता लकडे – 9373429631 • दशरथ मिसळ (वस्ताद) - 9049737427 • शिवा परळकर (वस्ताद) – 9822856649
सोलापूर गवळी समाज गणेशोत्सव मंडळ
सोलापूर शहरात गवळी समाज गणेशोत्सव मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाची विसर्जन मिरवणूक सातव्या दिवशी असते. शहरातील सर्व गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सात दिवसात दररोज सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. प्रमुख:
• संजय शहापूरकर - 8857556225 • संजय जानगवळी – 9423535797 • ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने – 9422645874 • आनंद साठे – 9823408088 • सुरेश बहिरवाडे - 9422460379
श्री सिदाजीअप्पा उत्सव समिती ट्रस्ट
प्रमुख:
• रकमण दहिहंडे • शंकर दहिहंडे - 9960131191