अखिल भारतीय गवळी समाज
महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, उस्मानाबाद, बीड, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, नांदेड, ठाणे, परभणी, बुलढाणा, भंडारा, लातूर, सांगली, हिंगोली, सिंधूदुर्ग आदी भागात वसलेले आहेत.
तसेच आंध्र व तेलंगना राज्यात हैदराबाद, महेबूबनगर, कर्नुल, अनंतपूर, गुंटकल, आधोनी या शहरात आढळतात.
कर्नाटकात विजयपूर (विजापूर) शहरात ३०० कुटुंब, व ता. ईंडी ५ कुटुंब, गुलबर्गा शहरात ३०० कुटुंब व ता. शाबाद ५० कुटुंब, ता. वाडी २५ कुटुंब, ता. सुरपूर ३० कुटुंब, ता. सुलतानपूर २० कुटुंब, ता. चिंचोळी २० कुटुंब, ता. सावळगी २० कुटुंब, ता. शहापूर १० कुटुंब, बेळगाव शहरात २०० कुटुंब व ता. गोकाक ५० कुटुंब, ता. चिक्कोडी ३० कुटुंब, ता. अथणी १० कुटुंब, गोकाक, हुबळी, गंगावती, बागलकोट शहरात ४० कुटुंब, जिल्ह्यातील ता. मुधोळ २५ कुटुंब, ता. गुळदगुड २५ कुटुंब, ता. इरकल ४० कुटुंब, ता. गजेंद्रगड १० कुटुंब, ता. रबकाई ५ कुटुंब, ता. अमीनगड ५ कुटुंब, बिदर शहरात १०० कुटुंब व ता. हुमनाबाद ३० कुटुंब, ता. बसवकल्याण ६० कुटुंब, ता. चिटगोप्पा १० कुटुंब, ता. रसाळ १० कुटुंब, ता. सस्तापूर बंगला १५ कुटुंब, धारवाड शहरात ३० कुटुंब व ता. हुबळी २०० कुटुंब, ता. कलघटगी १० कुटुंब, गदग शहरात २०० कुटुंब व जिल्ह्यातील ता. मूळगुंड १० कुटुंब, कोप्पल शहरात २० कुटुंब व ता. गंगावती १०० कुटुंब, ता. हुलगी १० कुटुंब, ता. गिरीगिणी १५ कुटुंब, रायचूर शहरात २०० कुटुंब व ता. अधोणी ३० कुटुंब, ता. देवदुर्ग १० कुटुंब, ता. जल्लोळी ५ कुटुंब, शिमोगा, बल्लारी, चित्रदुर्ग, तुमकुर, दावणगिर, वटकेरी, मैसूर, बंगलोर आदी भागात वसलेले आहेत.
लिंगायत गवळी पोटजातीत नगरकर व वझरकर असे दोन प्रकार आढळतात. नगरकर व वझरकर यांच्यात काही वर्षांपासून बेटी व्यवहार (सोयरिकपण) होत आहेत. तसेच काही वर्षापूर्वी शिमोगा, बल्लारी, चित्रदुर्ग, तुमकुर, दावणगिर, वटकेरी, मैसूर, बंगलोर, कर्नुल, अनंतपूर, गुंटकल, आधोनी या भागातील लिंगायत गवळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून त्यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. किसनराव हुंडीवाले यांच्या सततच्या दौऱ्यामुळे संपर्क वाढला आहे. व त्यांची माहिती गवळी समाज पोटजातीतील समाज बांधवांना होत आहे.
लिंगायत गवळी पोट-जातीतील काही आडनावे – झुनझुनकर, खेडकर, चवंडके, म्हैसकर, काळेगवळी
भगवान श्रीकृष्णामुळे यादवांशी स्नेहसंबंध निर्माण झाल्यामुळे लिंगायत गवळी यादव सैन्याला दूध पुरवण्याचे काम करत होते. मुस्लिम सत्तेच्या कालखंडातही ही जमात अस्तित्व टिकवून होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेतही लिंगायत गवळी जमातीचे तरुण सहभागी झाले होते. पेशवाईच्या काळात या जमातीच्या पैलवानांनी चांगली कामगिरी बजावली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ही जमात डोंगरामध्ये भटकंती करत होती; पण स्वातंत्र्यानंतर ती स्थिरावली. दुधाच्या व्यवसायाच्या निमित्ताने ही जमात नागरी संपर्कात आली. ही जमात पुणे, सोलापूर, धुळे, नाशिक, नागपूर, जळगाव, ठाणे, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, काही प्रमाणात कोकण पट्ट्यात आढळते.
आयुष्यभर जनावरांचा सांभाळ करणाऱ्या या जमातींचे जगणेच आता जनावरांसारखे सैरावैरा झाले आहे. शहरीकरणाचे चटके त्यांना बसू लागले आहेत. लोकांना दूध हवे; पण आपल्या घराजवळ गोठा नको. गोठे हलवण्यासाठी सरकारी यंत्रणाही मागे लागलेली असते. एकीकडे जनावरे कशी सांभाळायची, याची विवंचना. चारा मिळणे कठीण, त्यात सरकारी ससेमिरा अशा जंजाळात या जमाती अडकलेल्या आहेत.
गवळी समाजामध्ये लग्न समारंभ हा पाच दिवस चालतो. प्रथम गवळी समाजाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण पूजा व शिवधर्मानुसार शिवपूजा करून गाई म्हशीचे आराध्य म्हसोबा पूजनापासून सुरुवात होते. नंतर हिरवा मांडव घालून त्यामध्ये देवकुंडी स्थापन करून लिम नेसने हा कार्यक्रम रात्रीचे वेळेस घेण्यात येतो. गुरे-ढोरे घरी आल्यावर या पूजनाला सुरुवात होते. लिम नेसने म्हणजे आपल्या कुळातील सर्व लोकांना बोलावून अंगावरील कपडे काढून निंबाच्या डहाळ्यांनी अंग झाकून आपल्या कुळातील झोडपी सोबत घेऊन स्त्रियां पुरुष एकत्रपणे पूजा करतात. त्यामध्ये एक छोटासा मंडप रस्त्यावर लावण्यात येते. सर्व देव्हाऱ्यातील देव, सुपामध्ये ठेवण्यात येते पूजेमध्ये सूप, टोपली, फळा, सुकामेवा, फळ आदी आरास मांडण्यात येते नंतर दिवे लावून आपल्या देवाला प्रसन्न करण्यात येते. त्यामध्ये लग्नाकरिता आणलेले वधु वरचे कापडाची पूजा करण्यात येते हे कार्य दोन्ही पक्षांना पार पाडावे लागते. दुसऱ्या दिवशी जकिन-विर-देवकुंडी स्थापनेचा कार्यक्रम करतात. विवाह होत असलेल्या कुटूंबातील लेकी ज्या सुना म्हणून दुसऱ्याच्या घरी गेलेल्या असतात अशांना देवकुंडी स्थापनेचा मान देऊन पूजा करताना जकिन काढतात.
सात घरातील टिळ्याचे मानकरी काटकर दोन मुली होत्या.एकीचे नाव काळाबाई दुसरीचे नाव गोरीयमाई त्या दोघीएके दिवशी बाराच्या सुमारास, पाणी भरण्याकरिता डोहावर गेल्या. त्या डोहाचे नांव उबरडोहा असे होते. तेव्हा त्या दोघी पाणी भरत असताना ईश्वराची आघात करणी झाली एका एकीच त्या दोघी डोहात गुप्त झाल्यात. म्हणजे अदृश्य झाल्या. संद्याकाळी झाली तरीही घरी परत आल्या नाहीत म्हणून त्यांच्या आई वडिलांना व दैवतांना चिंता पडली म्हणून सर्व देव डोहावर आले व आक्रोश करू लागले तितक्यात त्या डोहातून सात मुली सूर्य मावळतांना पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन निघाल्या असे आपले सत्व दाखवून पाच वीर कन्या व जखीन त्या काठी संगे निघाल्या म्हणून त्या काटकराच्या मुली होय, म्ह्णून पहिला मान काटकरांना दिला आहे. पाच विर व सात जकन्या काटी घेऊन ‘विर आयविर आय’ असा जयघोष करून वर आले तेव्हा पासून आपल्या समाजात जकीन सुरु झाली. तेव्हा पासून पच जकीन व पाचगीर यांचीसुद्धा पूजा करण्यात येते. हे पाच कुळातील असायला हवे अशाप्रकारे सर्व कुळातील लोकांना आमंत्रण देऊन जवळच्या विहिरीवर कोऱ्या मडक्यामध्ये पाणी भरून त्यावर झाकणी ठेवून त्या झाकणीवर सरकी ठेवून दिवे लावतात. त्यामुळे आसरा माता प्रसन्न होते. मडक्यामध्ये आणलेल्या जलाने मंडप कार्याचे शुद्धीकरण होते. आणि हि मडकी पाचवीर व त्या जकीनच्या डोक्यावर ठेवतात व कोऱ्या लुगाड्यांनी खाली जमिनीवर पाय न टेकता त्यांनी लुंगड्याच्या वर पाय देऊन मांडवापर्यंत आणण्यात येते. पूजा पूर्ण झाल्यावर त्यांना गुळणी पुरी व घुगर्याचे जेवण देण्यात येते. नवरदेव हा लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुक्कामाला असतो. त्या रात्री साखरपुडा मागणी समारंभ पार पाडतात. पाचव्या दिवशी लग्न समारंभ पार पडतो.
लग्नाच्या दिवशी वधु वरांना त्यांच्या कुळातील सर्वांना बोलावून वरांची वधूची आंघोळ घालताना कुळातील सर्वांना त्यांचेसोबत नात्यागोत्यातील स्त्रिया आंघोळ घालतात याला ‘सुरगी’ म्हणतात. व त्यांच्या नात्या गोत्यातील बहिण, आत्या, मावशी असे नातेवाईक त्यांना आहेर आणतात. कुळातील सर्व गरीब श्रीमंत त्यांना नवीन कपडे मिळावेत या उद्देशाने नातेवाईक आहेर आणतात. या पद्धतीला ‘सुरगाई’ असे म्हणतात. यामध्ये दाईजावळ या पद्धतीचा वापर करतात.
गवळी वाड्यावर काही स्त्रिया बाळंत झाल्यानंतर १० ते १२ दिवसातच दूध-दही विक्रीकरिता जात असत कारण तो त्यांचा धंदा असल्यामुळे नाइलाजाने दूध-दही विक्रीकरिता जावे लगे. वाड्यावर एखादी बाई मूळ संभाळण्याकरिता राहत असे दूध-दही विकणाऱ्या बायांना जर वेळ झाला तर त्यांची मुलं रडत असत. तेव्हा ती घरी राहिलेली बाई रडणाऱ्या मुलांना आपले स्वतःचे दूध पाजत असे. जितक्या मुलांना तिने दूध पाजावे व दाई म्हणून सांभाळ केला ती सर्व एका आईची दुध प्यालेली असल्यामुळे त्यांना दाईजभाऊ असे म्हणतात. ही सत्यप्रथा आपल्या धर्मात टिकून आहे. आणि काही दाईजावळ त्यांच्या कर्तबगारीमुळे पडलेले असतात.
नंतर वराची वरात काढून हनुमान मंदिरावरून वधू मंडपी आणतात. लग्न सोहळा पार पाडतात. वटभरणाचा कार्यक्रम वरपक्ष आपल्या सवडीप्रमाणे करून घेतात.
१. प्रमुख सत्पुरुष २. नांव पंडित आराध्य शिवाचार्य (चंद्रशेखरस्वामी) ३. जन्मभूमी- धातु कुंडक्षेत्र ४. लिंग-शिवलिंग ५. सिंहासनस्थान - सिरसेल पर्वत सप्तशृंगी ६. सूत्र लेबान ७. प्रवर-विरशैव ८. अर्थवेध ९. कलशमसे धातु - लोखंड १०. वायू ११. बिजामंत्र-बिजाक्षर-ओंकार